आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र नरवडे तर उपसभापतीपदी नागवडेची बिनविरोध निवड

शिंदे राम   58   24-03-2025 15:50:18

पुणे- (Pcmctahalka.in) शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर उपसभापतीपदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणूकीनंतर होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

माजी आमदार ॲड. अशोक पवार यांचे वर्चेस्व होते. खरेदी विक्री संघाचा निवडणूकीत १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर २ जागा माजी आमदार अशोक पवार यांच्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर ५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात ५ ही जण अशोक पवार यांचे निवडून आले होते. यामुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक चुरशीची होईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात सभापती व उपसभापतीपदाची निवडी बिनविरोध झाली. खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीपूर्वी विद्यमान सभापती राजेंद्र नरवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

 

आज सभापतीपदाच्या निवडीकरीता राजेंद्र नरवडे व उपसभापतीपदाकरीता बाळासाहेब नागवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, कात्रज जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्ननील ढमढेरे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्ननील गायकवाड, बाजार समितीचे माजी सदस्य आबाराजे मांढरे, पक्ष निरीक्षक अण्णा महाडिक, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरुर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, माजी सभापती शरद कालेवार, माजी सरपंच प्रकाश थोरात, श्रीनिवास घाडगे, तज्ञिका कर्डिले, शृतिका झांबरे आदी उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.