आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पालघर

BBSM Cricket लीग माध्यमातून सुस बाणेरमध्ये सामुदायिक एकतेचा उत्सव; महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण

शरद लाटे  156   24-03-2025 15:42:38

Pune news (Pcmctahalka.in) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Pune City) पुणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पार्टीचे शहराध्यक्ष समीर चांदेरे आयोजित केलेल्या BBSM क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे, सौ. सरलाताई चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले,

क्रिकेटच्या मैदानात सामाजिक एकतेचा रंग:

१२८ पुरुष संघ, ५८ महिला संघ आणि ३५०० हून अधिक खेळाडूंच्या सहभागासह ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा एक भव्य सोहळा ठरली आहे. या स्पर्धेने क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा अनोखा रंग भरला आहे.

बक्षीस रकमेत वाढ; लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजकांनी केली घोषणा

खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष

कालच्या उद्घाटन समारंभात खेळाडूंच्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात BBSM क्रिकेट लीग 2025 ची ऊर्जा स्पष्टपणे दिसून आली. या क्रिकेटच्या महाउत्सवाला यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने अथक परिश्रम घेतले आहेत. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या सामन्यांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.