आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पिंपरी -चिंचवड

कामगार नेते दिवंगत माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

नितीन देशपांडे   43   24-03-2025 12:57:17

पुणे- (Pimpri-Chinchwad) पिंपरी, २३ मार्च २०२५ : समाजसेवेसाठी जीवन व्यतीत करणा-या थोर कामगार नेते, दिवंगत माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी विखुरलेल्या कष्टकरी कामगारांना एकत्र करुन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारला,माथाडी कामगार संघटना उभी करून कामगारांना पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, हक्क व सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.

थोर माथाडी कामगार नेते,माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी त्यांच्या के.एस.बी.चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी संपत धोंडे, दुर्गेश पाटील, किशोर सातकर, सुनील राणा, शंकर निकम, मच्छिंद्र चौधरी, बारगजे, अशोक थिगळे, बाळू ओव्हाळ यांसह पिंपरी चिंचवड, पुणे परिसरातील विविध कंपन्यांमधे, बाजार समिती आवारात काम करणारे माथाडी कामगार, मुकादम, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.