आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 रत्‍नागिरी

शिंदे साहेबांची माफी मागावी अन्यथा कुणाल कामराला पुण्यात पाय ठेवू देणार नाही - प्रमोद भानगिरे

शिंदे राम   115   24-03-2025 12:25:07

पुणे (Pcmctahalka.in) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक गाणं म्हटले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असून कुणाला कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने गाणं म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंविरोधात त्याने केलेल्या एका गाण्यावरुन वाद निर्माण झाला असून कुणाल कामराच्याविरोधात आता पुणे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी केली आहे ते म्हणाले की; तेढ निर्माण करणाऱ्या अशा अवलादींना तात्काळ अटक करून कठोर शासन केले पाहिजे अन्यथा आम्ही मोठे आंदोलन छेडू इशाराही दिला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.