Pune news -
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उबर ऑटो चालकांना एक एप्रिलपासून मीटर प्रमाणेच दर आकारावे लागणार आहेत. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी उबरने आपल्या नियमात बदल करत शेकडो ऑटो चालकासोबत करार केला.त्यामुळे एक एप्रिलपासून पुणे आणि पिंपरची चिंचवड परिसरात उबर ऑटो चालक आता इतर ऑटोसारखे मीटरप्रमाणेच दर आकारतील.
एक एप्रिलपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उबर रिक्षाचालक मीटर प्रमाणेच दर आकारणार आहेत. कंपनी ॲग्रीगेटर मॉडेलचा वापर न करता SAAS ( SOFTWARE AS A SERVICE) मॉडेलचा वापर केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उबरने रिक्षाचालकांबरोबर १८ फेब्रुवारी रोजी नवीन करार केला आहे, त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.