पुणे- भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली. या सत्कारसमारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील?
आपल्या भाषणांमध्ये बोलताना सुजय विखे यांनी म्हणाले की, या मंचावर सर्वच "आजी" आहेत मी एकटाच "माजी" आहे. माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं आणि माझंही पुनर्वसन करावं असं विखे पाटील म्हणाले. विखे पाटील यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व आमदारांनी जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये विखेंचा सहभाग मोठा असल्यानं तुमचं पुनर्वसन निश्चित होईल असं आश्वासन दिलं आहे.