चिंचवड प्रतिनिधी - (Pcmctahalka.in) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना मिळणारी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत बंद झाली आहे; सदरील मदत सुरू करावी अशी मागणी भोसरीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी केली आहे; याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आमदार लांडगे यांच्या मागणीला पाठिंबा देत 5000 ऐवजी 20 हजार रुपये देऊन अर्थसहाय्य करावे अशी मागणी केली आहे,
यावेळी काटे म्हणाले की; कालच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला यावर मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली आहे; मेडिसिनचा खर्च खूप वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना देखील पैसे भरणे कठीण होते त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने 5000 ऐवजी महापौर आरोग्य निधी लवकर सुरू करून 20000 करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबत निवेदन पाठवले आहे;
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जानेवारी- 2022 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत आर्थिक मदतीची रक्कम 5 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपयांवर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सदर प्रस्तावावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. सदर प्रस्तावावर कार्यवाही करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.