आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन; वाहनचालकांना दिलासा

शिंदे राम   25   21-03-2025 16:32:50

पुणे (pcmctahalka.in) २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अद्याप जुन्या वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवण्याचं काम संथगतीने सुरू असल्याने ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या परिवहन खात्याने याबाबत परिपत्रक काढून ३० जून २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ दिली आहे.अशी असते एचएसआरपी

अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेली

जाडी १ मिलीमीटरपेक्षा थोडी अधिक

क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक

होलोग्राम खाली लेझर बैंडेड १० अंकी पिन कोड असतो


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.