आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नागपूर

Dhayari Pune शनिवारी धायरीत रोजगार मेळावा नोकरीची संधी

शरद लाटे  56   21-03-2025 12:26:04

पुणे (Pcmctahalka.in) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २२) सकाळी १० वाजता धायरी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

इच्छुकांनी विभागाच्याwww.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन रिक्त पदांसाठी अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या) प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सागर मोहिते यांनी दिली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.