पुणे (Pcmctahalka.in) आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची लातूर मनपा ‘उपायुक्त’ पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या जागेवर माधव खांडेकर यांची नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आळंदी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची पदोन्नतीने आळंदी येथून बदली झाली असून त्यांची लातूर महानगरपालिका ‘उपायुक्त’ पदी नियुक्ती झाली आहे. तर नातेपुते (जि. सोलापूर) नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची आळंदी नगरपरिषद पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. आज शुक्रवारी ते पदभार स्वीकारणार आहेत.