आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 रायगड

Beed बीडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच महिलेनं अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना

शिंदे राम   218   20-03-2025 18:49:22

Beed (beed news crime) युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज (दि. 20) एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

मात्र, एका महिलेने संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याने आता हे प्रकरण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, इथेही पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला. परंतु, एक महिना होऊन गेला असला, तरी या प्रकरणात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.