आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 जळगाव

पुण्यात उपाहारगृहचालकाची आत्महत्या; गावगुंडाने घेतला अजून एक बळी

शिंदे राम   275   20-03-2025 18:43:18

पुणे (Pcmctahalka.in) भाडेतत्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने उपाहारगृह चालकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे

उपाहारगृहचालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महेश साखरे (वय ४२, रा. महादेवनगर, मांजरी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या उपाहारगृह चालकाचे नाव आहे. याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली (वय ३८) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, गणेश भालचंद्र घुले (वय ५०), रोहिणी संदीप तुपे (वय ४९), प्रशांत पुजारी (वय ३५), निलेश उत्तम घाडगे (वय ३२), सचिन जयराम शिंदे (वय ४५, सर्व रा. मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेश साखरे यांनी मांजरी भागात उपहारगृह सुरू केले होते. उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, तसेच काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. उपहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. पैसे परत करण्यास त्यांनी तगादा लावला. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे दीपाली साखरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.