मुंबई प्रतिनिधी :: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यानंतर मुंडेंनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजीनाम्यानंतर देखील त्यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण करुणा शर्मा यांनी मुंडेंच्या विरोधात तक्रार दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा शर्मा यांनी दिली होती. या प्रकरणी प्रकरणी शनिवारी (ता.15) परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
करुणा शर्मा यांच्या तक्रारीनुसार, धनंजय मुंडे यांनी 2024 ची परळी विधानसभा निवडणुकीत लढताना शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुले तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळकतीची माहिती लपवण्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला होता.