बीड (Beed news Narayangad )
कुलभूषण महात्मा समर्थ स्वामी नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धाकटी पंढरी श्री. क्षेत्र नारायण गड येथे संत -महंत, गडाची विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज (दि.११) गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून महंत संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने गडावर मोठा सोहळा पार पडला.
महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र गडाने वर्षानुवर्ष समाज उद्धाराचे कार्य केले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांना या ठिकाणी अध्यात्माची शिकवणही मोठ्या अट्टाहासाने दिली जात आहे. यामुळे श्री क्षेत्र नारायण गड हे तीर्थक्षेत्र अध्यात्माच्या पटलावर गुरुस्थानी आहे. श्री. क्षेत्र नारायण गडाचे आठवे उत्तर अधिकारी (मठाधिपती) वै. महंत महादेव महाराज यांचे १९ जुलै २०११ रोजी वैकुंठगमन झाले होते. यावेळी गडाचे नववे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न येथील विश्वस्त मंडळी सह पंचक्रोशीतील संत-महंत भाविक भक्तांना पडला होता. यातच धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडाची वर्षानुवर्षे पायी वारी करणारे, गडावरती आणि आपल्या गुरु वरती निष्काम निष्ठाण ठेवणारे वारकरी म्हणून महंत शिवाजी महाराज यांचे नाव समोर आले होते.नारायणगडची परंपरा संभाळून मी सेवा करीन- संभाजी महाराज
श्री. क्षेत्र नारायण गडाची उभ्या महाराष्ट्रामध्ये अध्यात्म आणि धर्म कार्याबद्दल ख्याती आहे. येथील परंपरेने प्रत्येकाशी सौजन्याने वागून समाज घडवण्याचे कार्य केले आहे. ही परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आता महंत शिवाजी महाराज यांच्यासह ट्रस्ट समितीने माझ्यावर टाकली आहे. उपस्थित संत -महंत भाविक भक्त यांच्या साक्षीने माझ्या जीवनातील हा सर्वाधिक मोठा सोहळा आज पार पडत आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. गुरुवर्य महंत शिवाजी बाबांचा शब्द मी खाली पडू देणार नाही. आणि येथील परंपरेने गडाचे धार्मिक कार्य, आणि माजी सेवा समर्पित करत राहील, असे अभिवचन यावेळी गडाचे नूतन उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनी दिले आहे.