कोथरूड प्रतिनिधी (Pune News) बाणेर येथील सर्वे नंबर ३३ मध्ये साहिल शिरीन, रिजेंट पार्क, ओलीव्ह हिल्स यांसारख्या अनेक सोसायट्यांना जोडणारा मालपाणी ॲजाइल इमारती शेजारील रस्ता महत्त्वाचा होता, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नांमुळे झाले.
या रस्त्याच्या कामासाठी पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी विशेष प्रयत्न करून पुणे महापालिकेची व राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे वारंवार पाठ पुरवठा केला होता, अखेर त्यांच्या मागणीला यश आले यामुळे सोसायटीधारकांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील व ज्योतीताई कळमकर पुणे शहराचे कार्याध्यक्ष गणेश कळमकर यांचे आभार मानले.
या वेळी भूमिपूजन सोहळ्याला डॉ. जनार्दन श्री. गणेश कळमकर, कदम, निलेश थोरात, राजेंद्र पाटसकर, मनीष आंबरे, किरण सायकर, शिवांजली कळमकर, प्रवीण जाधव, संजय ताम्हाणे, विजय जोशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.