मुंबई प्रतिनिधी- जलसंपदा आणि जलसंधारण खात्यात जर एखादा अधिकाऱ्याला फोन केला तर त्यावर निर्णय मोहित कंबोज घेतात असा गंभीर आरोप अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सरकारवर केलाय .जलसंपदा विभागातील बड्या अधिकाऱ्याशी मोहित कंबोज यांचे कनेक्शन असल्याचं सांगत या दोघांचे संभाषण सरकारने तपासावे, त्यांच्यावर सीडीआर तपासावा असंही अंबादास दानवे म्हणाले.कंबोज आणि अधिकारी दीपक कपूर या दोघांमधील झालेले संभाषण तपासा .त्यांच्यावर सीडीआर तपासा .सरकारने यावर चौकशी करावी अशी मागणी ही अंबादास दानवे यांनी केली .कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोज ने काय केले हे सांगू का ? फार पुढे गेलो तर लफडे होतील. कुठल्या मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केलेला मी समजू शकतो .मोहित कंबोजने हस्तक्षेप करण्याचे कारण काय असावाही अंबादास दानवे यांनी केला . राज्यपालांचे भाषण ,राष्ट्रपुरुषांचा अवमान या राज्यात होतोय .महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न एक समिती नेमली त्याची बैठक परत कधीही झाली नाही .त्याच्यावर विचारणा झाली नाही .दावस मध्ये झालेले करार ही राज्याची फसवणूक आहे .प्रशासन पूर्णपणे ढेपळले आहे .लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेत लाडक्या भावाला छळला जातंय .