आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

तुमच्या गाडीवर असलेला दंड तुम्हाला माहित आहे का आजच चेक करा गाडीवर किती आहे दंड

शरद लाटे  213   20-02-2025 14:12:11

पुणे (Pcmctahalka.in) आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा रहदारीचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात आणि हे ट्रॅफिक रुल्स फॉलो केले नाहीत तर आपल्या नावाने  ट्रॅफिक चालान शासनातर्फे आपल्याला देण्यात येते. आधी ट्रॅफिक हवालदार पावत्या कापून आपल्याला चालान देत असत. परंतू आता तसे नाही आता वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत की नाही   हे तपासण्यासाठी  ठिकठिकाणी, ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसविण्यात आले आहे, जर का तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडले तर तुम्हाला लगेच चालान दिले जाते. तुमच्या गाडीचा नंबर घेतला जातो आणि तुम्हाला दंड लावला जातो. 

यापुढे तुम्ही चुकून जरी वाहतुकीचे नियम तोडले असतील आणि तुम्हाला पोलिसांनी अडवले नसेल तर आनंदी होऊ नका कारण तुम्ही तोडलेला सिग्नल किंवा एखादा नियम तुम्हाला दंड भरायला लावू शकतो. कारण ते सगळं कॅमेऱ्याने टिपलेले असते.  त्यानंतर  थोड्याच वेळात तुमच्या नावे ऑनलाईन चालानचा मॅसेज येतो. आणि त्यालाच  इलेक्ट्रॉनिक चालान  म्हणजेच E challan  असे म्हटले जाते. 

असे तपासा तुमचे E Challan ऑनलाईन पद्धतीने

 भारतात सगळ्याच राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने E Challanतपासण्याची सेवा उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील वेबसाईट आणि ऍप च्या माध्यमातून E Challanतपासण्याची सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.  दोन पर्याया उपलब्ध आहेत. Traffic Challan Check

ई चालान तपासा महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन

ई चालान तपासा  मोबाईल ऍपच्या माध्यमातून

महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन ई चालान कसे तपासावे –

https://mahatrafficechallan.gov.in/  या लिंकवर क्लिक करून तुम्ही महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवर जाऊ शकता

तुमच्या Vehicle No भरा

त्याच्या खालील रकान्यात chassis/Engine No चे शावटचे तुमचा 4 digits  

सबमीट बटन दाबा, तुम्हाला तुमच्या वाहनाचा चालान इतिहास समोर दिसेल

तसेच प्रत्येक चालान वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते चालान कशासाठी लावण्यात आले आहे हे देखील फोटोच्या स्वरुपात दिसेल,

 

ई चालान तपासा मोबाईल ऍपच्या माध्यमातून

तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून Maha Trafficapp  डाऊनलोड करायचे आहे.

तुमचा  मोबाईल क्रमांट मागितला जाईल, तो तेथे भरा, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो तेथे भरा.

तुम्हाला ऍपमध्ये एन्ट्री मिळेल आणि तुम्हाला 6 पर्याय दिसतील

My Vehicles, My E – Challans, Civilian Report, Pay E – Challan, Grievance, Information  यामधील My E – Challans या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईल नंबरला कनेक्ट असलेला तुमच्या वाहनाचा नंबर समोर दिसेल, त्यावर चालान असेल तर ते देखील दिसेल

तुम्हाला लागलेले चालान भरायचे असल्यास तुम्ही Pay E – Challan या पर्यायावर क्लिक करुन चालान ऑनलाईन पद्धतीने भरु शकता,

 कोर्टात जाऊन दंड भरावा लागू शकतो

 बरेचदा वाहन चालकाला माहित देखील नसते की चालकाच्या नावने  वाहतुक विभागाद्वारे चालान जारी करण्यात आले आहे.  म्हणूनच शासनाने ऑनलाईन पद्धतीने चालान तपासता यावे म्हणून ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.  तुमच्या वाहनावरील चालान  तुम्ही वेळेवर भरले नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरावा लागू शकतो.  जर का तुम्हाला कोर्टाच्या  फेऱ्यांपासून वाचायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन चालान जमा करायला हवे.  Check e Challan Online

E – Challan  केव्हा भरावे लागते

बरेचदा वाहन चालकांना माहितीच नसते की E Challan कधी कधी आणि कोणत्या कारणांसाठी लावण्यात आलेले आहे.  त्यासाठीच वाहतुकीचे नियम आपण आज पाहणार आहोत. ई चालान सोबत देण्यात आलेल्या फोटो मध्ये आपण केलेली चुक दिसत असते. Check e Challan Online


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.