पुणे प्रतिनिधी (Pcmctahalka.in) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीच्या तयारीने जोर धरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला लहान पालकांना समजण्यासाठी एक अनोखी संकल्पना पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ पदाधिकारी कल्याणी टोकेकर, निकिता माताडे, हर्षदा माताडे, यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारली आहे.
"घरा घरात शिवराय, मना मनात शिवराय" हा विचार डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, त्यांची शौर्यगाथा संस्कारक्षम बालवयात लहान मुलात रुजावी म्हणून बाणेर बालेवाडी म्हाळुंगे भागातील अनेक प्री स्कूल्समध्ये मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले
सर्व शाळा शिक्षकांनी उत्तम तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली ऐतिहासिक वेशभूषा करून आलेल्या लहानमुलांनी "जय भवानी, जय शिवाजी" अशा दिलेल्या घोषणांनी सगळ्यांचा उत्साह वाढला,
चित्रकला, वेशभूषा, लेझीम पथक, शिवदिंडी, पोवाडा गायन
"शिवाजी महाराजांनी केला अफजल खानचा वध" ही नाटिका असे विविध कार्यक्रम १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी घेतले. ओरुगा वर्ल्ड, लिटिल मिलेनियम बालेवाडी, क्वांटम किड्स, लिटिल मिलेनियम, पिंपळे सौदागर, एरियाना स्कूल या पाच शाळांतील एकूण ३६० विद्यार्थां आणि ५० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, बक्षीस आणि खाऊ देण्यात आला
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसाठी असे कार्यक्रम घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.