सोलापूर प्रतिनिधी :: (pcmctahalka.in )
मंत्रिपदासारखे अनिश्चित काही नसते. आज पोलिस गाड्या आणि पोलिस अधिकारी इथे उभे आहेत. मात्र तीन महिन्यापूर्वी हेच पोलिस माझ्यामागे पळत होते मला शोधायला असं वक्तव्य केलं राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी.
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. सांगोला इथं उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला गोरे आले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी एक एक राज खोलले. शिवाय ठाकरे गटाच्या माजी आमदाराकडे कशी 10 लाखाची उधारी आहे, याचा किस्साच सर्वां समोर सांगितला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे ते माजी आमदार त्यावेळी स्टेजवर उपस्थित होते. त्यामुळे गोरे यांनी सांगितलेल्या या किस्स्याची चर्चा मात्र यापरिसरात चांगलीच रंगली आहे.
जयकुमार गोरे हे फडणवीस सरकारमध्ये ग्राम विकास मंत्री आहेत. सांगोला उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभाला ते आले होते. त्यावेळी त्यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. मागिल लोकसभा निवडणुकीत आपण दीपक आबा साळुंखे यांच्या बरोबर पैज लावली होती. साळुंखे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहे. शिवाय त्यांनी नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक लढवली होती. माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह निंबाळकर निवडून येणार असं आपण आबांना सांगितलं होतं. पण त्यांनी तसं होणार नाही असं सांगितलं. यावर आमची पाच लाखाची पैज लागली होती.
शिवाय सांगोला मतदार संघातूनही निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळेल अशी दुसरी पैज आपली दीपक साळुंखे यांच्या बरोबर लावली होती. ही पैज ही पाच लाखाची होती. या दोन्ही पैजा आपण जिंकलो. पण त्याचे दहा लाख आज ही मिळाले नाहीत. ती उधारी मागण्यासाठी आज तुम्हाला स्टेजवर बसवलं आहे असा मिश्किल टिप्पणी ही त्यांनी यावेळी केली. ही पैज या लोकसभा निवडणुकीच नव्हती असंही ते म्हणाले. आता मात्र हे दोघे ही घरी बसले आहेत, असं म्हणत त्यांनी दीपक साळुंखे आणि रणजीतसिंह निंबाळकर यांची नावं घेतली. हे दोघेही नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.