बीड(beed)
महाराष्ट्राचे आराध्यदैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सध्या राज्यासह देश-विदेशातही दिसून येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर, दुसरीकडे शिवजयंती साजरी करण्यासाठी बाँड पेपरवर हमी लिहून देण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एका गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी या बाँडची मागणी केली आहे.
शिवजयंतीचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, बीड जिल्ह्यात धक्कादायक मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल, तर बॉण्ड वर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच डॉ. रेशमा पोळ, ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे. या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.