पुणे (Pcmctahalka.in) :: बाणेर :
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 75% पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सौजन्याने आणि श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘विलोज’, ‘कम्फर्ट झोन’ आणि ‘प्रकृती’ या सोसायट्यांना मोफत मेडिकल सर्जिकल किटचे वाटप करण्यात आले.
मतदान हा फक्त हक्क नाही, तर कर्तव्य आहे. उच्च मतदान टक्केवारीने नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित होतो. या नागरिकांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान म्हणून या वैद्यकीय साहित्य किटचे वाटप करण्यात आले,
– गणेश कळमकर ( सरचिटणीस : भाजपा पुणे शहर
या उपक्रमात नितीन मेटकर, मित वीज, बलविंदर सिंग, दशरथ आवारे, सिद्धांत काबरा, अजय वाणी, मयूर कचरे, दिनेश मेहता, शिल्पा सिंग, कीर्ती सिंग, गौरव वालेचा, वसुधा बने, उज्वला तळेले, अरुणा सोनकांबळे यांसह सोसायटीचे सदस्य आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील आणि नागरिकांना भरीव सहकार्य केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात अधिकाधिक नागरिक मतदानासाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.