आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते खासदार सज्जन कुमार दोषी

शिंदे राम   82   13-02-2025 05:53:18

पुणे (Pcmctahalka.in) :: माजी खासदार सज्जन कुमार यांना 1984 मध्ये शीखविरोधी झालेल्या दंगली संबंधित एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. शीख दंगली प्रकरणात दिल्ली न्यायालयाने नुकतीच सुनावणी केली. तब्बल 41 वर्षांनी याप्रकरणी निकाल देण्यात आला आहे. 

यात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. आता येत्या 18 फेब्रुवारीला सज्जन कुमार यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.शीखविरोधी झालेल्या १९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी दिल्लीमध्ये एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार (Sajjan Kumar)  यांना दोषी ठरवले आहे. दंगलीदरम्यान १ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग नावाच्या शीख सरस्वती विहारमध्ये ठार झाला होता. या प्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले. सज्जन कुमारच्या शिक्षेवरही आता १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयामध्ये चर्चा करण्यात आली आहे.

 
दरम्यान तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, सज्जन कुमार हे दिल्ली लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार असताना त्यांनी जमावाला शिखांवर हल्ले करण्यासाठी भडकवले होते. तर यानंतर जामावाने घराचीही तोडफोड केली. तसेच लुटमार करत आग लावली. शेवटी जमावाने पिता-पुत्र दोघांनाही जिवंत जाळल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दिल्लीच्या कँट हिंसाचारामध्ये सज्जन कुमार याआधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी सज्जन कुमारलाही दोषी ठरवले आणि शिक्षेवरील युक्तीवादासाठी १८ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यासाठी तिहारी तुरुंगामधून न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी आता पंजाबी बाग पोलीस ठाण्याने सुरुवातीला गुन्हा दाखल केला. परंतु विशेष तपास पथकाने एसआयटी तपास हाती घेतला. १६ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने या प्रकरणामध्ये कुमार यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध प्रथमदर्शनी खटला असल्याचे आढळून आले आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.