बाणेर प्रतिनिधी (Pune News)::- कमी कालावधीत जास्तीत जास्त शारीरिक श्रम, व्यायाम व आरोग्य संवर्धनासाठी नजीकच्या काळात बाणेर,बालेवाडी,सुस,महाळुंगे, सोसायटी अंतर्गत 'BBSM आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती चेअरमन बाबुराव चांदेरे यांनी केले आहे,
दि. 21 मार्च ते 31 मार्च 2025 यादरम्यान भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी बीबीएमएस क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते, 2024 स्पर्धेत तब्बल 160 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, यामध्ये प्रामुख्याने महिला खेळाडूंची अधिकची उपस्थिती होती,
2025 - BBSM आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पहिल्यांदाच बाणेर,बालेवाडी,सुस,महाळुंगे, या भागातील सोसायटी अंतर्गत भव्य सामने पाहायला मिळणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी दिली आहे.
यावेळी आयोजक माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले की या भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन बाणेर बालेवाडी सुस माळुंगे भागातील सोसायटी धारकांनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान चांदेरे यांनी केले.
अधिक माहितीसाठी +91 91724 28686 संपर्क करा