अधिवेशनात कामगार महामंडळात झालेल्या बोगस कामगार नौदणीची फेर तपासणी लावुन दोषी अधिकारी, ग्रामसेवक, कॉन्ट्रॅक्टदारांनावर कठोर कारवाई करण्यास भाग पाडणार - आमदार सुरेश धस
पाटोदा(गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील प्रसिद्ध लेखक अशोक नजान सर यांनी ऊसतोड मजुरांच्या आयुष्यातील व्यथा, खडतर परिस्थिती व आव्हानांचे वर्णन करणारी ‘पाचरट’ ह्या कादंबरीची रचना केली आहे. या कादंबरीचा प्रकाशन सोहळा ह.भ.प.गुरुदेव महादेवानंद भारती महाराज, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लेखक अशोक नजान सर यांनी विविध वर्तमानपत्रासाठी अनेक लेख लिहिले आहेत. दैनिक सकाळच्या 'मैफल' पुरवणीत देखील त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आपल्या जिल्ह्यातील साहित्यिक म्हणून त्यांचा निश्चितच अभिमान आहे. मराठी साहित्यासाठी त्यांच्याकडून पुढील काळात देखील विपुल दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे हिच सदिच्छा व शुभेच्छा आमदार धस यांनी दिल्या ‘पाचरट’ कादंबरी कादंबरी नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल. सर्वांनी ही कादंबरी वाचावी व वाचन संस्कृती टिकवावी असे आपल्या मनोगत भाषणात आवाहन केले कामगार महामंडळात इतर नागरिकांनी अतिक्रमण केल्याने खर्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही म्हणून कामगार महामंडळात कामगार नोंदणी झाली त्यांची फेरतपासणी करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवू तसेच ज्या ग्रामसेवकांनी, व कॉन्ट्रॅक्टदारनी सह्या दिल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आशे मत देखील आमदार सुरेश धस यांनी वेक्त केले यावेळी विजय जावळे (साहित्यिक),विठ्ठल जाधव (साहित्यिक), अंमळनेर जिल्हा परिषद गटाचेनेते भाऊसाहेब भवर,पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव,अँड महेश भोसले, युवानेते संदीप जाधव,पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.