मुंबई प्रतिनिधी ::-
धनंजय मुंडेंबाबतचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. अंजली दमानियांनी मुंडेंवर केलेल्या आरोपाची, पुराव्याची जी माहिती मला दिली तिच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचंही अजित पवार म्हणालेत.
मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फुटबॉल झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर अंजली दमानियांनी कृषी विभागात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे आरोप केले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी चोहोबाजूंनी दबाव आलेला असताना अजित पवारांनी आता पुन्हा वेगळी भूमिका घेतलीय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील असं सांगत दादांनी फडणवीसांकडं चेंडू टोलावलाय.अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलावल्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी कानावर हात ठेवलेत. अजित पवार काय बोललेत हे मी त्यांना विचारीन नंतरच त्यावर बोलेन असं फडणवीसांनी सांगितलंय. पण मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलंय.
अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलावल्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी कानावर हात ठेवलेत. अजित पवार काय बोललेत हे मी त्यांना विचारीन नंतरच त्यावर बोलेन असं फडणवीसांनी सांगितलंय. पण मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलंय.