आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सिंधुदुर्ग

सांगवीमध्ये १६ वर्षापूर्वी खून करणाऱ्या आरोपीला गोव्यातून अटक

शिंदे राम   75   08-02-2025 14:23:44

पुणे (Pcmctahalka.in) :: सांगवी येथे १६ वर्षांपूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असेलल्या एका कामगाराने किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो ठिकठिकाणी वास्तव्य करत राहण्याची ठिकाणे बदलत होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने त्याचा माग काढत अखेर त्याला १६ वर्षांनंतर गोवा येथे पकडून अटक केली आहे. सुनील अशोकराव कांगणे (३९, रा. सुलाभट, गोवा. मूळ रा. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सन २००९ मध्ये सुभाष धाकतोंडे (५५, रा. रहाटणी) यांचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.पोलिस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००९ मध्ये सुनील कांगणे हा सांगवी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सुभाष धाकतोंडे यांनी त्याच्या ड्युटीचा पॉईंट बदलला. या कारणावरून सुनीलने सुभाष यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करून पसार झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे.सुनील मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आहे. खून केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी न जाता वेगवेगळ्या राज्यात जाऊन ओळख लपवून राहत होता. मात्र, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्या मागावर होते.

 
 
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार प्रमोद गर्जे यांना खबर मिळाली की, सुनील कांगणे हा गोवा येथे राहत आहे. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक गोव्याला रवाना झाले. पोलिसांनी गोव्यातून सुनील याला अटक केली. तपास सांगवी पोलिस करत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.