आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सिंधुदुर्ग

गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे लढणारा निष्ठावंत कार्यकर्ता अजित पवारांचा

नितीन देशपांडे   56   08-02-2025 10:29:50

पुणे प्रतिनिधी (Pcmctahalka.in) विशेष लेख ::- पुणे शहरे अत्यंत झपाट्याने वाढत गेले त्याच पटीने समाविष्ट गावात देखील शहरीकरण खूप झपाट्याने वाढत गेले, स्वारगेट लगतचा सिंहगड रोड अत्यंत झपाट्याने वाढला व त्याच लगतचे धायरी गाव अत्यंत झपाट्याने वाढले गेले एमआयडीसी वाढते नागरीकरण वाढती रहदारी अशा अनेक समस्याला यामुळे तोंड द्यावे लागले अचानक वाढलेल्या लोकसंख्येमुळे सुख सुविधेपासून नागरिकांना थांबावे लागले मात्र धायरी गावात जन्मलेले सुपुत्र राष्ट्रसेवा समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नावलौकिक करणारे राहुल पोकळे यांनी पुढची दूरदृष्टी ठेवत आपले गाव महापालिकेत घालवण्यासाठी अथक परिश्रम घेतले गाव पालिकेत आल्यानंतर निश्चितपणे मोठा निधी मिळेल हे त्यांना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा पाठपुरवठा करत त्यांनी आपले गाव पुणे महानगरपालिकेत आणले व त्यानंतर विकास कामाला सुरुवात झाली; 

खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा एक विकसित मतदारसंघ आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने मार्गदर्शन व नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघाने विकासाचा नवा मापदंड तयार केला आहे.

मात्र राहुल पोकळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत डीपी रोड संदर्भात मिटींग लावणे नवीन पाण्याच्या लाईन संदर्भात बजेट साठी मागणी करणे धायरी गावाचा त्याच्या प्रश्नासंदर्भात गाव विकणे आहे या माध्यमातून आपल्या राजकीय शैली वापरून टॅक्स बद्दल स्थगिती आणली व सर्वसामान्य लोकांची लूट थांबवली अन्यथा लोकांना तीन पट टॅक्स जास्त भरावा लागला असता वाढत्या महागाईचा विचार करून राहुल पोकळे यांनी हा योग्य निर्णय घेतला व त्याचा फायदा सर्वच 32 गावांना झाला,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना विजय बापू शिवतारे यांच्या सोबत अनेक वेळा त्यांनी गावाचे प्रश्न मार्गी लावले, वाढती वाहतूक पाहता ट्रॅफिकचा प्रश्न धायरीला प्रामुख्याने जाणवतो मात्र त्यांच्या मदतीला राष्ट्रसेवा समूह नेहमीच उभा राहतो आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर शिवजयंती उत्सव छत्रपती संभाजी महाराज उत्सव किल्ले सिंहगडावरती विविध उपक्रम ते राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून नेहमीच घेत असतात,

राष्ट्र सेवा समूह ही संघटना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना होय मात्र जिथे अडचण तिथे संघटना राहुल पोकळे यांच्या माध्यमातून नेहमी उभा राहते असे अनेक वेळा दिसून आले आहे,

कोविडच्या काळात देखील लोक एकमेकास बोलत देखील नव्हते मात्र त्यावेळी एमडीसीवर इंजेक्शन असो या कुठलीही अडचण असो, किंवा जी बी एस सारखा व्हायरस असो जीबीएस वायरस आल्यानंतर राहुल पोकळे यांनी जी भूमिका घेतली त्यानंतरच सरकारला देखील जाग आली ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल त्यानंतर यंत्रणा पूर्णपणे हादरली व संपूर्ण यंत्रणा कामाला लागली, असे विविध उपक्रम ते राबवताना दिसून येतात.

गावासाठी नेहमी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणूनच खरी ओळख

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उभा राहून अवघ्या काही मताने त्यांचा पराभव झाला मात्र खचून न जाता त्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली व त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभ्यासू नेतृत्वाला शासन नियुक्त नगरसेवक पदी नियुक्त केले त्या माध्यमातून राहुल पोकळे यांनी गावातील विविध भागात रस्त्यासाठी बजेट पाण्याची सोय कचऱ्यासाठी गाड्या अशा अनेक गोष्टीकडे आपला फोकस वळवला व त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्यामुळे निश्चितच नागरिकांना देखील दिलासा मिळाला मात्र गावासाठी प्रामुख्याने रस्ते पाणी ही अत्यंत मोठी समस्या आहे यासाठी देखील ते नेहमी पत्र व्यवहार करत महापालिकेशी भांडत असतात अधिकाऱ्यांशी भांडत असतात आणि त्यांना त्याचे यश देखील येते मात्र ते हळुवारपणे विकास कामासाठी विकास निधीसाठी कामे मार्गे लावून घेतात तळमळ करत काम करून घेणारा कार्यकर्ता म्हणजे राहुल पोकळे होय.

बचत गटाच्या माध्यमातून मोठा रोजगार उभा रोजगारातून केला समूह मोठा

राष्ट्रसेवा संघटनेच्या बरोबरच सौ स्मिता राहुल पोकळे यांचा देखील हातभार खूप मोठा आहे राशनिंग दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब महिलेच्या सुखदुःखापर्यंत जाणाऱ्या भगिनी म्हणून स्मिता पोकळे यांची खरी ओळख होईल, कष्टकरी महिलांसाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून धायरी सारख्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार महिलांचा समूह उभा करत त्यांनी मोठी भरारी घेतली महिलेच्या प्रत्येक सुखा दुखात आर्थिक अडचणीत त्या बचत गटाच्या माध्यमातून सहभागी होतात बचत गटाचे विविध कॅम्पच्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील केली जाते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.