आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 हिंगोली

ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत अद्विका प्रथम

नितीन देशपांडे   113   23-01-2025 10:58:05

पुणे::

अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शितल गजानन घाटोळ याची मुलगी कु. अद्विका हिने इंदौर येथे घेण्यात आलेल्या ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत २०२५ च्या विनर चा किताब पटकाविला आहे. अद्विका ही पुणे येथील बालेवाडीतील एम आय एस इंटरनॅशनल स्कुल मधिल इयत्ता सातवीची विद्याथ्यांनी असून तिला सिरियलची आवड आहे.

यापूर्वीही तिने विविध ठिकाणी पार पडलेल्या नामांकित स्पर्धेत दोन वेळा यश मिळविले आहे. तरुण प्रतिभावतांना फॅशन माडेलिंग आणि अभिनयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी मदत करणारे व्यासपिठ , ज्युनिअर मिस इंडिया २०२५ चा भव्य फिनाले इंदौर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये अद्विका हि भारतातुन प्रथम आली आहे. पुणे येथील फिनिक्स मॉल येथे २२ सप्टेबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये पाच ते तेरा वयोगटातील १०० मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामधुन निवड झालेल्या मुलींचा इंदौर येथील हॉटेल मॅरीयट येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धत अद्विकाने संपुर्ण देशातुन प्रथम क्रमांक पटकावित.

महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र असलेली नऊवारी आणि मराठी साज केलेल्या स्त्रिया त्यांच्या मराठमोळ्या लुकने अनेकांचे मन जिंकून घेतात. अद्विकाने देखील सांस्कृतिक कार्यक्रमात मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.