आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 औरंगाबाद

पोटावर बसून केली मारहाण; गर्भवतीचा घेतला जीव

नितीन देशपांडे   269   19-01-2025 07:34:30

संभाजीनगर: संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये एका गर्भवती महिलेची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या पोटावर बसून मारहाण केली.

या मारहाणीत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडित महिलेनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र शवविच्छेदन अहवालातून या बनावाचं बिंग फुटलं आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

मनिषा सतीश सपकाळ असं हत्या झालेल्या ३४ वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर सतीश लक्ष्मण सपकाळ (पती), लक्ष्मण कडुबा सपकाळ (सासरा) आणि लीलाबाई लक्ष्मण सपकाळ असं आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी सिल्लोड शहरातील शास्त्री कॉलनीत राहतात. मृत महिलेचे वडील खंडू किसन शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मनिषा आणि आरोपी पती सतीश यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मनिषा यांना मूलबाळ होत नव्हतं. यावरून सासरच्या मंडळींकडून मनिषाचा छळ केला जात होता. शिवाय पैशांची मागणी केली जात होती. पण मुलगी त्यांचा त्रास सहन करीत होती. गुरुवारी रात्री मला मुलीचे सासरे लक्ष्मण सपकाळ यांनी फोन केला. तुमच्या मुलीने फाशी घेतली, असे सांगत त्यांनी फोन कट केला. आम्ही तातडीने सिल्लोड गाठून उपजिल्हा रुग्णालयात गेलो. तिथे मुलगी मृत अवस्थेत होती. माझ्या मुलीला पती, सासरा आणि सासू यांनी गर्भवती असताना पोटावर बसून जबर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला, असं वडिलांनी तक्रारीत म्हटलं. पीडितेचं शवविच्छेदन केलं असता मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.