आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 जालना

140 जणांकडून 11 कोटी 20 lakh हडपले", वाल्मिक कराडचा नवा कारनामा उघड

शरद लाटे  427   11-01-2025 18:09:51

बीड

अशातच वाल्मिक कराडचा आणखी कारनामा समोर आला आहे. ऊसतोड मशिनला 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरमधील शेतकऱ्याने हे गंभीर आरोप केले असून भितीपोटी तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे.

 

काय आहे प्रकरण?

ऊसतोड मशिनला 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो असे सांगून वाल्मिक कराडने 140 लोकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याचा आणि ते पैसे परत न केल्याचा खळबळजनक दावा पंढरपूरमधील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे यांचीही ऊस तोड मशीन असून त्यांच्यासह एकूण 140 लोकांकडून वाल्मिक कराडने पैसे हडपल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे.

सध्या खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा उघडकीस येत आहेत.

वाल्मीक कराड यांच्यामुळे अनेक ठिकाणी लूट झालेले निष्पन्न होत आहे तरी देखील सरकार का गप्प आहे नेमकी पाठराखंड वाल्मीक कराडची सरकार का करत आहे यामुळे ग्रह खात्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.