बीड
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड हे सध्या अटकेत असून, त्यांच्याविरोधातले अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट
"हभप वाल्मिक अण्णा कराड याच्यावर फक्त 22 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 7 गुन्हे हे भादंवि 307 चे आहेत. कलम 307 मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो. ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी दुखापत! जर या 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून 220 गुन्हे दाखल होतील. असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही, त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही . अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे रहायचे. परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते. 307 सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत; तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो. अशा माणसाला वाचविण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे !"
आहे !"