आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सरकार धनंजय मुंडेच्या पाठी तर मुंडे वाल्मीक कराडच्या पाठीमागे खंबीरपणे उभा

शरद लाटे  214   09-01-2025 09:48:53

बीड

वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर तो परळी समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.

वाल्मिक कराड याच्यावर १४ गुन्हे असतानाही तो अध्यक्षपदी आहे. वाल्मिक कराड याची शिफारस मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांची शिफारस वादात अडकली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. वाल्मिक कराड याच्यावर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिक कराडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती झाल्याचे समोर आले असून कराडवर १४ गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतले कसे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मीक कराड सदस्य म्हणून असल्याचं समोर आले आहे. 

सरकार मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिल्याचे दिसून येते तर धनंजय मुंडे हे आरोपी वाल्मीक कराड यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत त्यामुळे वाल्मीक कराड वर कठोर शासन होणार का नाही यात महाराष्ट्रातील जनता संभ्रमणात दिसून येत आहे,

निश्चित पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील संशयाची फेरी भविष्यकाळात वाढताना दिसू शकते त्यामुळे फडणवीसनी मुंडे यांच्या राजीनामा घेऊन पारदर्शक चौकशी करावी अशी देखील मागणी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे

केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाशी कथित संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याच्याबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.