पुणे
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका करताना आमदार उत्तमराव जानकर (MLA Uttamrao Jankar) यांची जीभ घसरली होती.
त्यांनी मुंडेंचा उल्लेख पुरुष वेश्या असा केला होता. त्यानंतर आताही जानकरांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.
धनंजय मुंडे म्हणजे "पुरुष वेश्या " असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या वरद हस्तामुळेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे" असा आरोप जानकर यांनी केला. "सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी झाल्यामुळेच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे" असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला.असे बरेच घणाघाती आरोप, वादग्रस्त वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी सरकार, निवडणूक आयोग, धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत.