अकलूज प्रतिनिधी
Santosh deshmukh murder case ) राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो" असा दावा आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे.
सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू
"धनंजय मुंडे म्हणजे "पुरुष वेश्या " असल्याची जहरी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता. गृहखातं जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे" असा आरोप जानकर यांनी केला आहे. " वाल्मिक कराड सरकारसोबत तडजोड करूनच पोलिसांना शरण गेला आहे. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे" असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता उत्तमराव जानकर यांनी धनजंय मुंडे यांच्या संदर्भात जळजळीत टीका करून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.