पुणे
एके काळची लोकप्रिय गाडी आहे. तिची लोकप्रियता इतकी होती, की त्या काळी सर्वत्र टाटा सुमो दिसायच्या. आता ही गाडी नव्या रूपात पुन्हा सादर होण्याची शक्यता आहे.
भारतात होणार असलेल्या ऑटो एक्स्पो 2025मध्ये अनेक नवी कार मॉडेल्स लाँच होणर आहेत.
नव्या सुमोमध्ये प्रीमिअम इंटीरिअर पाहायला मिळू शकतं. त्यात स्पेस उत्तम असेल. 5-7 जण आरामात बसू शकतील. गाडीत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि आरामदायक अपहोल्स्ट्री अशी फीचर्स पाहायला मिळू शकतात. सेफ्टीसाठी 6 प्लस एअरबॅग्ज, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह ईबीडी, ब्रेक असिस्ट आणि थ्री पॉइंट सीट बेल्ट यांसारखी फीचर्स मिळू शकतात.
नवी सुमो पेट्रोल आणि डिझेल इंजिन प्रकारात दाखल होऊ शकते. त्यात 2.0 लिटर इंजिन मिळू शकतं. ही एक रफ अँड टफ एसयूव्ही असेल. तिची संभाव्य किंमत 12 ते 14 लाख रुपये असेल. या नव्या मॉडेलबद्दलची सगळी माहिती 17-18 जानेवारीला जाहीर होण्याची शक्यता आहे. ही नवी सुमो पर्सनल आणि कमर्शियल वापरासाठी असेल.