पुणे
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशीसंबंधित खंडणी मागितल्याने मंत्री धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे.
वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकारीही थक्क झाल्याची चर्चा आहे.
अनेक नेत्यांकडून जाहीर भाषणांमधून आरोप
24 तास'ला 'टू द पॉइण्ट' कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हावरटपणाचे राजकारण धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंनी वाळुतून पैसा, राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप केला. याच मुलाखतीमध्ये धस यांनी वाल्मिक कराडने 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. याच संपत्तीसंदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिकला नोटीस आल्याचंही धस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर वाल्मिक कराडची संपत्ती 1500,000,00,00,000 इतकी आहे.
आहे.