पुणे
अहिल्यानगर शहरात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीतील विजेत्या कुस्तीगीरास मानाची गदा आपल्या हस्ते प्रदान करण्यात यावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून केली. यावेळी माझ्यासोबत केंद्रीय राज्य मंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. मुरलीधर (आण्णा) मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके व इतर मान्यवर उपस्थित होते. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर शहरात पार पडणार असून आयोजनाची जबाबदारी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघास मिळालेली आहे. अंतिम लढतीस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे अशी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची, जिल्हा कुस्तीगीर संघाची व राज्यातील तमाम कुस्तीप्रेमींची इच्छा असल्याने जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेऊन विनंती केली.