आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर स्वतः अजित पवारांनी राजीनामा दिला; मात्र धनंजय मुंडेंना सूट का?

शिंदे राम   33   07-01-2025 09:12:58

मुंबई प्रतिनिधी - 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या वाल्मिक कराड यांच्या निकट संबंधांमुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येताना दिसून येत आहेत महाराष्ट्र राज्य सिंचन घोटाळा समोर आल्यानंतर आयएएस अधिकारी पांढरे व सामाजिक कार्यकर्ते अंजनी दमानिया यांनी हा 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार समोर आणला त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत ही चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे असे अजितदादा पवार यांनी जाहीर केले होते व ते सरकारच्या बाहेर देखील झाले, या निर्णयामुळे महाराष्ट्रातून त्यांचे स्वागत देखील झाले मात्र आज संतोष देशमुख प्रकरण गाजत असताना धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अजित पवार दुपटी भूमिका का घेत आहेत असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अजित दादा सारख्या पारदर्शी नेत्याने धनंजय मुंडेची पाठराखण करणे हे पक्षाला देखील परवडणारे नाही असे देखील राजकीय जाणकार बोलताना दिसून येत आहेत नेमके धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे अजित पवार एवढे ठामपणे का उभा राहिले आहेत असा देखील प्रश्न उपस्थित होतांना दिसून येत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी विविध जिल्ह्यात मोर्चे निघत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.