आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा

नितीन देशपांडे   251   06-01-2025 22:48:02

पुणे 

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. दोघांमध्ये सागर बंगल्यावर २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची माहिती आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.