मयत संतोष देशमुख यांच्या भावाला बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने धमकी दिली म्हणून मी परभणीच्या भाषणात त्यांना ताकीद दिली, मी वंजारी समाजाबद्दल बोललो नाही, बोलणार नाही.
पण त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करून आणि मला खेटून चूक केली. आता यांची संपूर्ण प्रकरणे काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, असे आरोप ठेवून परळी शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. परभणीच्या सभेत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. रविवारी सायंकाळी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
धनंजय मुंडे यांनी कुख्यात गुंडगिरीचे संघटन उभे केले, वेळ आली की ओबीसी म्हणायचे
धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे सगळे खंडणीचे लाभार्थी
आम्ही कोणत्याही एका जातीला लक्ष्य करीत नाही. आम्ही वंजारींना न बोलता त्यांच्या गुंडगिरीला बोललो. जे बोलत आहेत, ते सगळे खंडणीचे लाभार्थी आहेत. न्याय द्या बोललो म्हणून मी जातीयवादी होत असेल तर होय मी जातीयवादी आहे. धनंजय मुंडेंना जातीय तेढ निर्माण करायची आहे. तो मला खेटलाच आहे तर त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिदे, अशी मागणी जरांगे यांनी केली.