बीड
बीड सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. ही माणुसकीची हत्या आहे. म्हणून आम्ही सर्व पक्षातील लोक राज्यपालांना भेटत आहोत.
बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणी राजभवनावर जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही अंतुले, आरआर आबा, अशोक चव्हाण, मनोहर जोशी असतील यांनीही जनतेचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग सरकार यांना संरक्षण का देत आहे, अजित पवार यांना का संरक्षण देत आहे, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. तसेच असे अनेक प्रश्न आहेत, त्याबाबत आम्ही राज्यपालांसमोर मांडत आहोत.