लातूर जिल्हा ::
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. यातील आठ आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. प्रत्येकावर हत्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी, खंडणी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये सुदर्शन घुलेसह आठ आरोपींचा समावेश असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास एस आय टी, सीआयडी आणि स्थानिक पोलीस करत आहे. आतापर्यंत या गुन्ह्यांत नऊ आरोपींना अटक केली असून, ते सर्व सीआयडी कोठडीत आहेत.
कुणावर किती गुन्हे दाखल...
हत्या प्रकरणातील आरोपी
- सुदर्शन घुले- 19
- विष्णू चाटे - 2
- सुधीर सांगळे -2
- प्रतीक घुले -5
- जयराम चाटे -3
- महेश केदार- 6
- कृष्णा आंधळे- 6
- सिद्धार्थ सोनवणे - 1
खंडणी प्रकरणातील आरोपी
- वाल्मीक कराड - 15
- विष्णू चाटे -2
- सुदर्शन घुले- 19