Beed
मी प्रेस घेतली तर या खासदाराची चड्डी जागेवर राहाणार नाही', अशी धमकी देणारी पोस्ट टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला आता खासदार (Bajrang Sonawane) बजरंग सोनवणे यांनी खुले आव्हान दिले आहे.
'तूला माझी विनंती आहे, तू एकदा प्रेस घेच' अशा शब्दात बजरंगबाप्पांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला खुले चॅलेंज दिले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत पोलीस अधिकारी मुंडे व पाडळसिंगी चे एपीआय बांगर यांनी सर्वसामान्य लोकांना किती त्रास दिला हे देखील जाहीर करतो याची देखील व्हिडिओ माझ्याकडे आहेत तू प्रेस घे किंवा नको घेऊ मी ते जाहीर करणारच आहे कारण मी तुमच्यासारखे पोलीस खात्यात शासनाच्या पगार घेऊन सर्वसामान्यांची लूट करत नाही गुन्हा न दाखल होण्यासाठी किती रुपये तुम्ही घेता हे देखील जाहीर करतो विथ प्रूफ आजपर्यंत तुम्ही कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली हे देखील याची माहिती मी काढत आहे त्यामुळे मुंडे साहेब तुम्ही प्रेस घ्या आमच्या विरुद्ध बोला काही प्रॉब्लेम नाही लोकशाहीत बोलले पाहिजे तुमचा नेहमीच आदर करू खासदार बजरंग सोनवणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना चांगलाच इशारा दिला आहे
पुणे येथील आक्रोश मोर्चात बोलताना बजरंग सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या पोस्टचा उल्लेख केला. (Beed News) काल एक अधिकारी म्हणाला, की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही, माझी विनम्र विनंती आहे की तू एकदा प्रेस घेच, तुला विविध ठिकाणी पोस्टिंग कोणाच्या मेहरबानी मिळाली आहे, हे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणात दिला.