आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

बीड पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्याला सुद्धा भीत नाहीत तर खासदारांना काय घाबरणार? सर्वसामान्य लोकांवर नेहमीच दादागिरी

शरद लाटे  286   05-01-2025 08:40:46

बीडच्या जिल्हा पोलीस प्रेस व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टनंतर काही वेळातच वरिष्ठांकडून त्यांना रिमुव्ह करण्यात आलं.

मात्र पोलिसांनीच खासदारांविरोधात केलेल्या पोस्टने चर्चेचा विषय बनला आहे.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. ज्यात खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात वादग्रस्त लिखाण होते. बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आणि आज गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या ग्रुपवर ही पोस्ट केली.

 

गणेश मुंडे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

 

गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शनिवारी (4 जानेवारी) रोजी सायंकाळी एक पोस्ट केली. यामध्ये ''या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर..., असं म्हटलं. या पोस्टनंतर खासदार कोण?, अशी विचारणा देखील काही पत्रकारांनी ग्रुपवर केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना सदर ग्रुपमधून काढून टाकले.

गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासा; बजरंग सोनावणेंची मागणी

पाडळसिंगी येथील एपीआय बांगर घेतो श्रीमंतांचे पैसे व देतो गरिबांना त्रास?

बीड पोलीस दलातील पाडळसिंगी येथील बांगर हे एपीआय सर्वसामान्य लोकांवर मारहाण करत गुन्हे दाखल करतात यावर देखील गुन्हा दाखल होणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे जिल्ह्यामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की ते खोटेनाटे गुन्हे सर्वसामान्य शेतकऱ्यावर दाखल करतात व मोठ्या श्रीमंत लोकांकडून पैसे घेतात व त्यांचे काम करून देतात बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी राज्याच्या मुख्यमंत्र्याला तरी घाबरतात का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. तसेच बजरंग सोनावणे यांनी गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.