आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

नवले पुल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर कारवाई

नितीन देशपांडे   219   04-01-2025 22:20:25

सिंहगड रोड प्रतिनिधी

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाच्या परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात सिंहगड रस्ता पोलिसांनी चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच नवले पूल परिसरात पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र तरीही या परिसरात वेश्याव्यवसाय सुरूच असल्याचे समोर आले आहे. या परिसरात थांबून देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच त्या अश्लील हावभाव करतात. अशी नागरिकांनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही महिन्यांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील नवले पूल परिसरात काही महिला रस्त्यावर थांबून वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. स्थानिकांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दोनच महिन्यांपूर्वी पोलिसांनी आठ महिलांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

या महिला रस्त्यावर थांबतात. अश्लील हावभाव करतात. या प्रकारामुळे स्थानिकांना त्रास व्हायचा. या भागातील तरुणी आणि महिलांना याचा त्रास झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाच्या जवळ सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

या कारवाईनंतर या परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते. मात्र पुन्हा एकदा काही महिला या भागात वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या आहेत. या महिला अश्लील हावभाव करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.