आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

गोपीनाथराव मुंडे असते तर धनंजय व पंकजा मुंडेंना बाद केले असते शिंदे सेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

शरद लाटे  79   04-01-2025 16:40:45

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case)

स्वर्गीय मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंना राजकारणातून बाद केले असते जिल्ह्यात जातिवाद करण्यात मुंडे भाऊ-बहीण आघाडीवर आहेत हे मुंडे साहेबांना कधीच आवडले नसते ते अशी टीका कीर्तीकर यांनी केली

या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी महायुतीतील नेते करत आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता शिंदे गटातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच नाही तर या नेत्याने मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. यावरून महायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा मागितला आहे. बीडच्या घटनेनंतर बंधु-भगिनींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं असून जर त्यांना हवं असतं, तर ते अनेक वाल्मिक कराड निर्माण करू शकले असते. पण गोपीनाथ मुंडे असे नेते नव्हते,” असे गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा मागितला आहे. बीडच्या घटनेनंतर बंधु-भगिनींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. 

धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात जातिवाद सुरू केला पैशाचा आज व सत्तेचा दुरुपयोग धनंजय मुंडे यांनी करत जिल्ह्याचे नव्हे तर गोपीनाथ मुंडे यांचे नाव खराब केले अशी टीका कीर्तीकर यांनी केली


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.