आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

नितीन गडकरींचा राज्यकर्त्यांना सल्ला……आमदार व त्यांच्या लोकांना सरसकट

शरद लाटे  77   04-01-2025 13:33:26

पुणे--

आमदार आणि त्यांच्या लोकांना सरसकट शाळा, आश्रम शाळा आणि कॉलेजं वाटू नका. आश्रम शाळांचं रेटिंग ठरवा, चांगल्या शाळांना प्रोत्साहन द्या आणि वाईट शाळांना यंत्रणेतून बाहेर काढा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदारांना दिला. ते नागपुरातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्क्रमात ते बोलत होत. आज जेव्हा विखे माझ्याकडे आले होते. तेव्हा माझ्याकडे चर्मकार समाजाची एक मुलगी आली होती. ती एअर हॉस्टेस म्हणून सिलेक्ट झाली. आपल्याकडे मेघालय, त्रिपुरा भागातील मुली, काही आदिवासी समाजातील आहेत, त्या एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करतात. लो एम इज क्राइम. येणाऱ्या काळात आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण आणि कौशल्य कसं मिळेल याकरता योजना करण्याची आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट शाळा, कॉलेज आणि आश्रम शाळा आमदारांना आणि आमदारांबरोबर येणाऱ्यांना लोकांना वाटू नका. मी ही माझ्या काळात पालकमंत्री असताना वाटल्या. मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा. मुलांना चांगलं शिक्षण द्या, अन्न द्या. त्यांना त्यांच्या पायांवर उभं करा, मग दोन पैसे तुम्ही कमवा. पण तुम्ही सर्वच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा माराल तर असं नाही जमणार”, असं नितीन गडकरी म्हणाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.