अहिल्यानगर प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी अशी मागणी पदाधिकार्यांसह शिवसैनिकांनी केली होती. परंतु ऐन वेळी नगर शहराची जागा शरद पवारांच्या राष्ट्रीवादीला सोडण्यात आली. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसैनिकांमधील नाराजी चव्हाट्यावर आली. तसेच पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दिलिप सातपुते दीपक खैरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून ते जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या समवेत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला