बीड प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याची मागणी सुरूच असून काही राजकीय नेते सातत्याने यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत, सध्या बीड जिल्ह्यातून विविध व्हिडिओ बाहेर पडताना दिसून येत आहेत मात्र हे पाहिल्यानंतर खरंच बीड महाराष्ट्रात आहे का असा देखील प्रश्न पडताना दिसून येत आहे,
https://x.com/LMaharasht84320/status/1875202996277227721?t=Jzc9XC59Ef112ay1cN1hyw&s=09
https://www.instagram.com/reel/C8yr65pSt1Z/?igsh=anA0NXVrbXNodmUw
निवडणुकीच्या काळात चक्क नॅशनल हायवेवर फुरसुंगी फाटा ते सिंगरवाडी फाटा यादरम्यान तीनशे ते चारशे युवकांनी एकत्र येत हातात काठ्या दगडे घेत गाड्या अडवत मोठी लूट केली आधार कार्ड पाहून तू कुठल्या जातीचा आहे याची विचारणा करत मारहाण तोडफोड करण्यात आली यासंबंधी या जमावावर गुन्हे दाखल होणार आहेत का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, नॅशनल हायवे दरम्यान नांदेड परभणी बीड जालना या जिल्ह्यातील पुणे व मुंबईला हा रस्ता वापरतात मात्र अशा घटनांमुळे भयभीत वातावरण पाहायला मिळाले होते, मोबाईल ट्रेस करून तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई करण्यात यावी असे देखील मागणी होताना दिसून येत आहे तात्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर हे देखील यात दोषी असून यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.