बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अवादा कंपनीकडे केलेली खंडणीची मागणी याचा सध्या सीआयडी तपास करत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहेत. तर त्याचवेळी गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यांने दिलेल्या एका कबुलीमुळे वाल्मिक कराड हा आणखी गोत्यात आला आहे.
विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली होती आणि त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली असल्याचा आरोप अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांने पोलीस तक्रारीत केला आहे. तर त्याचवेळी विष्णू चाटे यानेही आपल्या कबुली जबाबत असं म्हटलं आहे की, वाल्मिक कराड यांना फोन लावून अवादा कंपनीचे शिंदे यांचेशी बोलणे करुन दिले.
खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड याचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे, पीसीआरसाठीची मागणी केलेली होती, त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. जी खंडणी मागितली होती, ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती. त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती, असे स्पष्ट झाले आहे. सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे. विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी निश्चित वाढणार असल्याचं चित्र आहे. या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यानी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराड वरती असलेला आरोप काटे यांनी मान्य केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला होता.
विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो.विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.